drop of water after rain

drop of water after rain
photo by me

Saturday, December 10, 2011

श्री झोलाई वाघजाई देवी मंदिर - बोरज, खेड रत्नागिरी.

सुमारे ३०० वर्षापूर्वी या देवस्थानी स्थापना करण्यात आली असावी असा अंदाज आहे. श्री झोलाई मानाजी पंचे काळकाई वाघजाई सोमजाई काल्पेश्वर व बाजीबावा अशा प्रमुख देवता आहेत. शिवाय सात आमरा व शिलिंग संधीसह स्थापना करण्यात आली आहे. या देवस्थानाचे मुख्य आठ मानकरी आहेत. देवालयातील कडवी असून मध्यभागी स्थापित असलेली वाघजाई शिवशंकर व सात आसरा हि चोखी म्हणजे गोडी देवते आहेत. गर्भगृहातील देवस्थानांना तिथीनुसार म्हणजे चेतावली दसरा, दिवाळी व श्री देवीच्या गोंधळाच्या वेळी कोंबड्या बळी देण्याची प्रथा आहे. म्हणूनच त्यांना कडवी देवस्थाने साम्भोधली जाते. वर्षभरात जे देवाचे उत्सव होतात. त्यातील शिमगा व दसरा हे मोठे उत्सव असतात. शिमग्यात फाकपंचमीपासून शिम्गायला सुरुवात होते. होमाच्या दिवशी देवीची पालखी सजवण्यात येते. तेह्वापासून एकूण सात दिवस पालखी गावातील प्रत्येक मिरवणुकीने वाजत -गाजत फिरवली जाते. एकूण आठ दिवस देवीची पालखी रात्री मानकरी यांच्या घरी बसविण्यात येते. फाल्गुन शुद्ध नवमीला भंडारा म्हणजे शिंपणे करण्यात येते.


यापूर्वी गर्द वनराईत हे गावदेवीचे मंदिर होते. जीर्ण व कौलारू मंदिर असल्याने ग्रामस्थांनी हे मंदिर दुरुस्त करण्याचा संकल्प केला. सन २००६ साली या मंदिराच्या जीर्नोधारास सुरुवात करण्यात आली आणि सन २००८ मध्ये बांधकाम पूर्ण झाले दिनांक ५ डिसेंबर २००८ रोजी श्री देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी सर्व मुर्त्या नव्याने घडविण्यात आल्या. चिपळूण येथील प्रसिद्ध मूर्तीकार नारळकर यांनी या सुबक व रेखीव मूर्ती घडविल्या आहेत. प्राणप्रतीष्टेचा कार्यक्रम ह. भ. प. श्री भारती महाराज आळंदी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी काळशारोहण देखील करण्यात आले. नवीन मंदिरामुळे येथील वातावरण संपूर्ण बदलून गेले आहे. गर्दवनराईमुळे हे मंदिर बाहेरून तसेच रस्त्याने जाणाऱ्या येणार्यांना दिसतही नव्हते. आज मंदिराची भव्यता सहज लक्षात येते.


जेव्हा मंदिर बांधण्याचा संकल्प केला गेला तेव्हा गावाच्या हाती फ़क़्त दहा हजार रुपयेच होते. प्रत्येत कुटुंबामागे वर्गणी जमा करण्यात आली परंतु तेवढ्याने भागाने शक्य नव्हते. हे सुंदर मंदिर व्हावे हि देवाचीच इच्छा असल्याने, अनेकांनी उदार हस्ते देणग्या दिल्या विशेष म्हणजे गावातूनच भरघोस देणग्या आल्या पै-पाहुणे, हितचिंतक, यांच्याकडूनही बाहेरगावातून देणग्या जमा झाल्या. श्री प्रकाशराव घोसाळकर, श्री अनिल राजाराम घोसाळकर, तसेच रायगड निवासी व मुंबई येथील आमदार श्री विनोदजी घोसाळकर यांच्यासारखे दानशूर पुढे आले. उदार हस्ते त्यांनी भरघोस देणग्या दिल्या. म्हणूनच दोन वर्षात सुमारे बावीस लाख रुपये खर्च करण्यात आला व सुंदर मंदिर उभारण्यात आले. श्री प्रकाशराव घोसाळकर यांनी सुमारे ऐंशी हजार रुपये खर्च करून बोअरवेल खोदून कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था केली आहे. कोंकणात येणारे पर्यटक तसेच मुंबई गोवा महामार्गाने जाणारे - येणारे भाविक या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी अलीकडे येऊ लागले आहेत सुंदर परिसर व उंच सावली देणारी झाडे यामुळे अनेक वाहने येथे थांबतात. पाण्याची व्यवस्था असल्याने कित्येक प्रवाशी, पर्यटक येथे निवाऱ्याला दुपारचे जेवण करतात. हा परिसरच सर्वाना भुरळ घालणारा आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा तसेच श्री प्रकाशराव घोसाल्कारांचा हे मुंबई गोवा महामार्गावरील बोरज गाव मंदिर हे पर्यटन स्थळ व्हावे ही इच्छा आहे आणि देवीच्या कृपेने ती नक्कीच पूर्ण होईल यात शंका नाही.


हे देवस्थान एक जागृत देवस्थान आहे. गावातील तसेच बाहेर गावातील लोक आपल्या इच्छा पूर्तीसाठी नवस करतात. त्यांचे नवस पूर्ण झालेले आहेत. विशेष करून शिमग्यामध्ये मोठ्या प्रमाणात नवस केले जातात. ज्यांना कोणाला मुल होत नसेल तर शिमग्यात शेरणे घालण्याची पद्धत आहे. शेरणे घालणारी व्यक्ती शेरणे ज्या परिसरात घातले असेल तो परिसर सांगतात व पालखीच्या साह्याने शेरणे काढले जाते. आजपर्यंत ज्यांचे शेरणे काढले गेले आहेत त्यांना मुले झाल्याचे दाखले आहेत. मोरावांडे गावाची देवी व बोरज गावाची देवी यांचे जवळचे नाते मानले जाते. दर तीन वर्षांनी बोरज व मोरावांडे गावांच्या सीमेवर म्हणजे शेवरवाडीनाजिक दोन्ही देवींची शिमग्यात भेट होते. यावेळी हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक जमा होतात. त्यामुळे या कार्यक्रमाला जत्रेचे स्वरूप येते.

मानकर्यांमध्ये कै. गंगाराम भिकाजीराव घोसाळकर हे देवीचे थळेस्त्री म्हणून काम पाहत होते. त्यांचे पश्यात त्यांचे वंशज हे काम पाहत आहेत. तसेच देवीचे पुजारी निगडे येथील गुरव घराणे आहे. या घराण्यातील सध्या श्री राजाराम भानू गुरव हे रोजची पूजा करतात. या गावाची लोकसंख्या सुमारे एक हजार पाचशे असून सर्व लोक एकोप्याने नांदत आहेत. सर्वांच्या श्रमदानातून आर्थिक सहकार्यातून हे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment